मतचोरीच्या विरोधामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीच्या वतीने आज रविवारी धामणगाव रेल्वे शहरातील शास्त्री चौक येथे एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच विविध सेल व कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थिती होती मतचोरीच्या मुद्द्यावर निषेध व्यक्त करीत आंदोलनकर्त्यांनी लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला. आंदोलनादरम्यान इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी मतचोरीच्या विरोधातील आंदोलनाची भूमिका 13 कोटी मतदाराचे मत वगळण्यात आले आणि निवडणूक आयोग भाजपच साठी काम करत आहे त्यामुळे लोकशाही ही संपुष्टात येत आहे.
यासंबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. शिव व्याख्यान करते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री प्रवीण देशमुख, श्रीकांत गावंडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष पंकज वानखडे, कम्युनिस्टने नेते विनोद जोशी, सतीश चौधरी, लोकशाहीर धम्मा खडसे , योग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मयूर दुबे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शिंदे, मा शहराध्यक्ष,प्रदीप मुंदडा, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष दर्शन भोगे, सच्चिदानंद काळे, वसंतराव देशमुख, शुभम भोंगे, संजय शेंडे, नंदकुमार मानकर, अविनाश इंगळे, सुधीर शेळके, अशोक काळे, राजेंद्र आठवले, दिनकर जगताप, संदीप दावेदार, विशाल रोकडे, सचिन घारपळकर, मुकुंद माहुरे, गणेश धवणे, संदीप दावेदार, डॉ शिंदे , सुनील भोगे, सचिन समोसे, रुपेश गुल्हाने,मंगेश बोबडे, नरेंद्र सावंत, मोरेश्वर शेंडे, आकाश झेले,प्रफुल कडू, निवृत्ती वैद्य, रोशन डाफ, विशाल डुबे, रोशन पाचबुद्धे, अनुप भोगे, शुभम तरोणे, वैभव पावडे, विकी बोरकर, तनवीर खान,आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, सेवा दल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.






